हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

गोखळी , खटकेवस्तीसह परिसरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहत साजरा

गोखळी (प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी, खटकेवस्ती परीसरामध्ये ७८ व्या भारतीय स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी शालेय कवायत, राष्ट्रगीत,ध्वजगीत, राज्य गीत राष्ट्रभक्तीपर गीत सादर करून मानवंदना दिली.

गोखळी गावातील विविध सार्वजनिक संस्थांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले.  गोखळी जिल्हा परिषद शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश गावडे ग्रामपंचायत गोखळी येथे माजी सैनिक दत्तात्रय जगताप गोखळी विविध कार्यकारी सोसायटी येथे व्हॉइस चेअरमन वसंत घाडगे  सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय गोखळी येथे उपाध्यक्ष चेतन गावडे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गोखळी येथे हनुमान माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील सस्ते सर, हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटी गोखळी येथे सदस्य सुरेश भाऊ जगताप. प्राथमिक उपआरोग्य केंद्र गोखळी येथे ज्येष्ठ आरोग्य सेविका गुप्ते मॅडम हनुमान माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे मार्च २०२४ मध्ये इयत्ता बारावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कुमारी श्रध्दा धर्माधिकारी व विद्यार्थिनीचे वडील विजय धर्माधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच खटकेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालन वाघमोडे यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र वळकुंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले, खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे कार्यालयाच्या प्रांगणात माजी सैनिक यांच्या पत्नी श्रीमती मांढरे यांच्या हस्ते सरपंच बापूराव गावडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली.

यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वार्षिक परीक्षेत प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक विजेत्यांना रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले आणि भारत सरकार मान्य ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन ही आरोग्य, शिक्षण  संस्कार या क्षेत्रात काम करीत आहे संस्था विद्याथ्र्यांचा आत्मविश्वास वाढवा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील परिक्षेची भीती दूर व्हावी यासाठी शासनमान्य संस्थांच्या माध्यमातून DTSE हा प्रकल्प राबवत आहे संस्थेच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत हनुमान माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा गोखळीतील पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. इयत्ता दुसरीतून नूतन अमोल हरिहर तृतीय क्रमांकइयत्ता तिसरीतून स्वराज सुखदेव साळुंके प्रथम क्रमांक इयत्ता तिसरीतून, आर्यन विशाल पोळके द्वितीय क्रमांक. इयत्ता तिसरीतून प्रथमेश प्रविण कुंभार तृतीय क्रमांक, इयत्ता चौथीतून प्रज्ञा प्रशांत कुलथे उत्तेजनार्थ. इयत्ता चौथीतून स्वप्नाली सतिश गावडे उत्तेजनार्थ सातवीतून कुमारी आर्या बापू विरकर प्रथम क्रमांक तसेच जनसेवक सागर दादा गावडे यांच्या यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वकृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी पुढील प्रथम क्रमांक सानिका दत्तात्रय ढोबळे, व्दितीय क्रमांक विभागून रितिका संतोष गावडे व राजनंदनी विठ्ठल पडर तृतीय क्रमांक विभागून काव्या कुणाल गावडे, व अदित्य रामदास कदम, उत्तेजनार्थ समृद्धी दत्तात्रय वनारसे. विद्यार्थ्यांना रोख बक्षीस चषक व प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!