ताज्या घडामोडी
स्वातंत्र्य दिनानिमित्त रॉयल इंग्लिश स्कूल जावली येथे दशरथ चवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
७८व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आय.आय. केअर फाऊंडेशन बारामती यांच्या वतीने रॉयल इंग्लिश स्कूल जावली यांना २५ सगंणक व लॅपटॉप संच भेट
(अजिंक्य आढाव/ जावली)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे या उद्देशाने फलटण पूर्व भागातील जाई एज्युकेशन सोसायटी संचलित रॉयल इंग्लिश स्कूल जावली या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक , क्षेत्राबरोबर संगणकीय ज्ञान मिळावे . यासाठी आय.आय. केअर फाउंडेशन बारामती यांच्यावतीने 25 संगणक व लॅपटॉप संच 15 ऑगस्ट म्हणजेच आज भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत भेट देण्यात आले.
फलटण पूर्व भागातील अव्वल दर्जाचे शिक्षणा बरोबर बरंच , राज्यस्तरीय खेळाडू, शिष्यवृत्ती परीक्षा या मध्ये राॅयल इंग्लिश स्कूल जावलीचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते.
आय आय केअर फाउंडेशन बारामती यांच्या वतीने जावली ता.फलटण येथे १५ लाख वृक्ष लागवड उद्दिष्ट ठेवण्यात आले. या संस्थेचे संस्थापक डॉ. संतोष भोसले यांच्यावतीने सध्या काम सुरू असून जावली गाव हे जगाच्या नकाशावर वेगळया उद्दिष्टाने दिसेल.