हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

सुधाकर पठारे सातारा जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक

 (फलटण/ प्रतिनिधी)- ठाणे शहराचे पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी नवनियुक्त करण्यात आले आहे.तर सातारचे पोलिस अधीक्षक यांची मुंबई शहराच्या उपायुक्त पदी बढती मिळाली आहे.वैशाली कडुकर साताऱ्याच्या नवीन अप्पर पोलीस अधीक्षक तर आंचल दलाल समदेशक राज्य राखीव पोलीस बल पुणे गट क्रमांक 1 येथे बदली.

राज्यातील 17 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचसोबत 11 अप्पर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलीस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

 

बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी

अतुल कुलकर्णी – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

श्रीकृष्ण कोकाटे – पोलीस अधीक्षक, हिंगोली

सुधाकर बी. पठारे – पोलीस अधीक्षक, सातारा

अनुराग जैन – पोलीस अधीक्षक, वर्धा

विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा

शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे

संजय वाय. जाधव – पोलीस अधीक्षक, धाराशीव

कुमार चिता – पोलीस अधीक्षक, यवतमाळ

आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१, पुणे

नंदकुमार ठाकूर – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड

निलेश तांबे – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर

पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती

नुरुल हसन – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.11, नवी मुंबई

समीर अस्लम शेख – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

अमोल तांबे – पोलीस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे

मनिष कलवानिया – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

अपर्णा गिते – कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई

शासन आदेश, गृह विभाग, क्र. आयपीएस-२०२४/प्र.क्र.८८/पोल-१, दिनांक ०७.०८.२०२४ द्वारे, श्रीम. प्रियंका नारनवरे, भा.पो.से, समादेशक,  रा. पोलीस बल गट क्र. ४, नागपूर यांची “पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर” या पदावर बदलीने करण्यात आलेली पदस्थापना, याद्वारे, रद्द करण्यात येत आहे. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी कायदा व सुव्यवस्था, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी.

हा शासन आदेश, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न (२) मधील  सर्वोच्च सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८१३१८२०५६७३२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!