ताज्या घडामोडी
सुधाकर पठारे सातारा जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक
(फलटण/ प्रतिनिधी)- ठाणे शहराचे पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी नवनियुक्त करण्यात आले आहे.तर सातारचे पोलिस अधीक्षक यांची मुंबई शहराच्या उपायुक्त पदी बढती मिळाली आहे.वैशाली कडुकर साताऱ्याच्या नवीन अप्पर पोलीस अधीक्षक तर आंचल दलाल समदेशक राज्य राखीव पोलीस बल पुणे गट क्रमांक 1 येथे बदली.
राज्यातील 17 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचसोबत 11 अप्पर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलीस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.