(फलटण /प्रतिनिधी)- दि.१२ सरडे गावच्या सरपंच पदी सौ. नंदाताई मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप कोकरे ,तसेच सरडे गावचे ग्रामविकास अधिकारी गाढवे आण्णा, तलाठी प्राची बावळे, यांच्या उपस्थितीत बैठक मध्ये बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व सदस्य तसेच गावचे नेते मंडळी यांच्या सहकार्याने सौ. नंदाताई मोरे यांना सरडे गावाच्या विकास कामे करण्यासाठी बिनविरोध निवड करून नवीन संधी दिली आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) तसेच श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर (बाबा), कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर (बाबा) आमदार दीपक चव्हाण, विश्वजित राजे नाईक निंबाळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सरडे गावच्या सरपंच पदी सौ.नंदाताई रणधीर मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) तसेच श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर (बाबा), कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर (बाबा) आमदार दीपक चव्हाण, विश्वजित राजे नाईक निंबाळकर, यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
सरडे गावातील सरपंच पद हे आज पर्यंत मोरे कुटुंबाला मिळाले नव्हते परंतु मोरे कुटुंबीयांना सदस्य पद मिळाले होते. सरपंच पद आज पर्यंत मिळाले नाही हे सरपंच पद मिळाले या मध्ये कित्येकांचे सरपंच पद न मिळण्यासाठी प्रयत्न होते परंतु श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गावचे गट नेते सुखदेव बेलदार तसेच माझी सभापती सुरेश बेलदार, तंटा मुक्त अध्यक्ष महादेव चव्हाण , माजी सरपंच विद्यमान सदस्य दत्ता भोसले, उपसरपंच सचिन बेलदार , माजी सरपंच प्रियांका नवनाथ धायगुडे , माजी सरपंच राणी संजय जाधव,माजी उपसरपंच श्री. राजाभाई मगदुम करजगे शेख,श्री. कांतीलाल शंकर बेलदार
माजी सरपंच सौ. पुनम मारूती चव्हाण, माजी उप सरपंच श्री. महादेव आबा विरकर, सदस्य सौ. रूपाली अजिनाथ धायगुडे,सदस्य सौ. मंदा सोमनाथ करडे,तसेच सरडे गावचे ग्रामपंचायत कर्मचारी श्री. भाऊसाहेब विष्णू आडके,श्री. शेंडगे अशोक बबन,श्री. चव्हाण पप्पू लिबाजी,श्री. संजय शंकर जाधव, तसेच सरडे गावचे पोलीस पाटील मनोज मोरे कोतवाल सिद्धार्थ मोरे या सह सरडे गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.