गोखळी (प्रतिनिधी)”माझं कवितांचं गांव जकातवाडी” पदग्रहण समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने गोखळी ता.फलटण येथे दि.११ ऑगस्ट रोजी काव्यमैफिलीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.गोखळी हे निरेच्या काठी वसलेलं गाव असून याच निरेच्या काठी अनेक कवींच्या कवयित्रींच्या वाणीतून जण उमललेल्या फुलाप्रमाणे बहरली.
यावेळी या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ,प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव,धैर्य टाईम्सचे संपादक सचिन मोरे, माझं कवितांचं गाव जकातवाडी राजधानी साताराचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे,कविसंमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी सरपंच नंदकुमार गावडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बजरंग गावडे ( सवई.) अभिजीत जगताप,सागर गावडे ,माजी सरपंच अमित भैया गावडे,सुनिल जगताप, सोमनाथ गावडे,सुरेश जगताप,अतुल कोकणे,किशोर जगताप, हनुमंत जगताप, उपस्थित होते.
प्रेमकवितेतून व्यक्त झालेला प्रियकर,भावकवितेतून व्यक्त होणारी तरुणी,निसर्गाच्या विविधरूपांना शब्दांचे कोंदण देऊन कवितेच्या माध्यमातून उभे केलेले निसर्ग चित्र आणि लोकसंगीतातील पोवाडा,लावणीचा ठसका अनुभवण्याची संधी गोखळीकरांना पदग्रहण कार्यक्रमाच्या निमित्ताने व काव्य संमेलनातून मिळाली.विविध कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळवली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून वृक्षास पाणी देण्यात आले.संमेलनात प्रकाश संकुडे (आसू),वसंत संकुडे(आसू ), ॲड.आकाश आढाव (फलटण), प्रशांत काळे (कापशी),अस्मिता खोपडे, स्नेहल काळे,अविनाश चव्हाण (फलटण), विलास वरे (खंडाळा) आनंदा भारमल (खंडाळा) ,संतोष झगडे (बारामती) आबासो मदने (गोखळी),शाहिर प्रमोद जगताप (गोखळी) या कवी कवयित्रींनी विविध विषयांवरच्या कविता,भावगीत,गझल लावणी,पोवाडा,मुक्तछंद अशा विविध प्रकारच्या कविता सादर केल्या.
मनोगते व्यक्त करताना अनेकांकडून या अनोख्या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.याच दरम्यान माझं कवितांचं गाव जकातवाडी राजधानी सातारा शखव फलटण कार्यकारी मंडळाचा पदग्रहण कार्यक्रम घेण्यात आला.माझं कवितांचं गाव जकातवाडी राजधानी सातारा फलटण कार्यकारी मंडळात अध्यक्ष प्रमोद जगताप, उपाध्यक्ष गुड्डराज नामदास, उपाध्यक्ष ॲड आकाश आढाव, सचिव अविनाश चव्हाण, संचालक प्रकाश संकुडे, स्नेहल काळे ,ज.तु.गार्डे ,सुशिल गायकवाड कु.दामिनी ठिगळे ,राजेश माने,कु.अस्मिता खोपडे,, श्रीमती भाग्यश्री खुटाळे आदींच्या नियुक्त्या करण्यात आलेले आहेत.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून मनोजतात्या गावडे,पोलीस पाटील विकास शिंदे आणि माजी उपसरपंच अभिजित जगताप यांनी सांउड सिस्टिम,स्वागत साहित्य आणि अल्पोहार देऊन अनमोल सहकार्य केले.काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिध्द काव्यशब्द सम्राज्ञी जयश्री माजगावकर (मेढा ) यांनी केले.अध्यक्षीय भाषणातून रानकवी जगदिप वनशिव यांनी सर्व कवीच्या कवितांचे समिक्षण व्यक्त केले. तसेच फलटण उपाध्यक्ष गुड्डराज नामदास यांनी आभार प्रदर्शन केले.