हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

सासकल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप मुळीक तर उपाध्यक्षपदी दिनेश मुळीक बिनविरोध निवड

निवड प्रक्रिया शांततेत

(फलटण/प्रतिनिधी ): फलटण तालुक्यातील सासकल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये नुकतीच बिनविरोध, सर्व सहमतीने, एकमताने पालकांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील तरतुदीप्रमाणे मागील शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल समाप्त झाल्याने नवीन समितीची निवड प्रक्रिया पार पाडली. गेल्या शाळा व्यवस्थापन समिती मधील या समितीचे अध्यक्ष दीपक भानुदास घोरपडे व तत्कालीन सर्व सदस्यांचे चांगलं काम केल्याबद्दल व नवीन शाळांच्या मंजुर इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावून प्रशस्तवर्ग खोल्यांचं काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सन २०२४- २०२५ ते सन २०२५-२०२६ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून संदीप अशोक मुळीक तर उपाध्यक्षपदी दिनेश दत्तात्रय मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षक प्रतिनिधी म्हणून पांडुरंग निकाळजे यांची तर शिक्षण तज्ञ म्हणून अतुल सुभाष मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या सदस्य पदी अनिल मुळीक, निकिता दीपक घोरपडे, संदीप फडतरे, संगीता पोपट खोमणे,दिपाली निलेश चांगण, रविना सागर देवघरे,शंकर मुळीक, धैर्यशील दळवी, अमृता वैभव कवितके,चंदन कोळी, वैशाली मुळीक, नामदेव मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल गावचे सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा सुधारक संघटन, सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांनी नवीन शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर, बल्लाळ, पदवीधर शिक्षक पांडुरंग निकाळजे, सुधीर ढालपे,रूपाली शिंदे, कीर्ती निकाळजे,संध्या गोरे हे शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!