हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचे लक्ष ; जिवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांची फलटण शहर पोलिसानं कडून कसुन चौकशी

(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण शहरात गेले अनेक वर्षे पासुन नायलॉन मांजा मुळे नागरीकांना जिवघेण्या सारखा प्रकार घडला आहे.या साठी फलटण शहरात विशेष पथक तयार करून पतंग उडवणाऱ्यावर व नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली असून त्याची किरकोळ विक्री करणाऱ्या किंवा प्रमुख विक्रेत्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल. त्याचप्रकारे ज्या वस्तूंपासून पर्यावरणास हानी पोहाेचेल अशा नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती .फलटण पोलीस ठाण्याचे डीवायएसपी राहुल धस साहेब यांनी दिली.

नायलॉन मांजा विक्री व हाताळणी करताना काेणी आढळल्यास त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशू-पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होवून जीवदेखील गमवावा लागला आहे.

अशा प्रकारच्या पतंग उडवण्याच्या धाग्यामुळे झालेल्या प्राणघातक इजांपासून पक्षी व मानव जीवितांचे संरक्षण करण्याची गरज आहे. अशा दुर्मिळ व नष्टप्राय होत असलेल्या निष्पाप पक्ष्यांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.

पतंग उडवताना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवित हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नायलाॅन मांजाचा साठा, विक्री व वापर करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!