(जावली /अजिंक्य आढाव) कुरवली खुर्द ता.फलटण, जि.सातारा येथील विवाहित महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
दि.16/03/2024 रोजी ते दि 5/8/2024 दरम्यानच्या कालावधीत वेळोवेळी फलके वस्ती मोई तालुका खेड जिल्हा पुणे येथे व कुरवली खुर्द तालुका फलटण जिल्हा सातारा येथे फिर्यादी यांची मुलगी मयुरी सुरज गोळे वय २७ वर्ष हीस तिचा नवरा सुरेश मनोहर गोळे यांनी वेळोवेळी चारित्र्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली आहे त्याचप्रमाणे तिची ननंद अर्चना राहुल राजगुडे,सासू सुनंदा मनोहर गोळे व सासरा मनोहर सदाशिव गोळे यांनी सुद्धा तिचा 20 लाख रुपये हुंड्यासाठी व चारित्र्याच्या कारणावरून वरील प्रमाणे शारीरिक व मानसिक छळ करून तिला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद दि.8 रोजी प्रभाकर बाळासो जाधव वय 60 वर्षे रा.देशमुखवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे.सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.