आपला जिल्हा
श्रावणातील सोमवारी माता भगिनींना मोफत देवदर्शन
गोखळी ( प्रतिनिधी) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील आसू गावातील माता, भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोफत आसू ते शिखर शिंगणापूर दर्शन मोफत सेवा श्रावण महिन्यातील सोमवार साठी सुरु केली आहे.
जनमत फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे सुभाषदादा पवार (येतकाळे) आणि युवा ऊद्योजक ,श्रीकांत उर्फ(आबा)शेडगे यांच्या सहकार्याने ही सेवा काळेश्वर आणि शंभू महादेवाच्या आशिर्वादाने सेवेचा प्रारंभ केला गाड्यांना नारळ वाहून पुढे प्रस्थान करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर डॉक्टर दशरथ भोई ,राजेंद्र गोफणे, अजित येतकाळे, संभाजी शेडगे श्री अशोक ढवळे , बाळासो चव्हाण श्री ज्ञानदेव गोफणे , राजेंद्र गायकवाड , अशोक बोंगाणे श्री रोहित शेडगे आणि आसू गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
टिप हि सेवा श्रावण महिन्यातील सोमवारी उपलब्ध करून दिली जाणार आहे यासाठी नोंदणी संपर्क९९६०२४८०७७/९९२२२२११४४ वरील नंबर वर करण्यात यावी.