(जावली/अजिंक्य आढाव) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात (अ.जा) निवडणुकीत बौद्ध समाजाला राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी द्यावी अशी मागणी, संविधान समर्थन समिती, फलटणच्या वतीने विधान परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रितसर उमेदवारीची मागणी करा ,माझे सहकार्य राहील.माझा बौद्ध समाजाच्या उमेदवाराला विरोध नाही, अशी सकारात्मक भूमिका श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली .
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्धांनी ” एकच निर्धार बौद्ध आमदार…! ” अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू करण्यात आले व त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रमुख पक्षांकडे बौद्ध उमेदवार द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने असे श्रीमंत रामराजे निंबाळकर यांनी भेट घेऊन संविधान समर्थ समितीच्या वतीने राष्ट्रवादीची मागणी करण्यात आली आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेले निवेदनामध्ये असे म्हटले आहे की फलटण मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणुकीत बुद्ध समाजाचा प्रतिनिधी( तिकीट )द्यावा असा प्रस्ताव देत आहोत.
आपल्या निर्णयामुळे येथील अनुसूचित जाती मधील संख्याबहुल बौद्ध समाजाला राज्याच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणे संधी मिळेल आणि आपल्या पक्षाची ताकद व बुद्ध संबंधी संख्या यामुळे निश्चित १०० टक्के आपला उमेदवार आमदार होईल या विधानसभेनंतर होणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या सर्व निवडणुकीला सर्व बौद्ध समाज आपल्या पाठीशी एक निष्ठेने नक्कीच उभा राहील.
तरी उपरोक्त विषयास अनुसरुन , येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या माध्यमातून (आपणास योग्य वाटणाऱ्या तथा आपल्या पक्षासाठी कार्यरत असणाऱ्या) बौद्ध समाजाच्या व्यक्तीला यावेळी आमदारकी साठी उमेदवारी मिळावी,ही विनंती.