हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

रहदारीसाठी धोकादायक ठरलेल्या सासकल रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी सुरू

(फलटण /प्रतिनिधी): मौजे सासकल ता.फलटण येथील फलटण दहिवडी रस्ता ते सास्कल गावठाण जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे व रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी कुंपणामुळे रहदारीसाठी धोकादायक ठरलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण यांच्यामार्फत सुरू झाले आहे.

यासंबंधी सासकल जन आंदोलन समितीचे उपाध्यक्ष विनायक मदने, दिनेश दत्तात्रय मुळीक, सामाजिक कार्यकर्ते गोरख बाबा मुळीक व ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. यासंबंधी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण यांना सदर रस्त्याचे काम तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण यांच्यामार्फत सदर रस्त्याच्या लगत वाढलेले काटेरी कुंपण काढण्याचे काम सुरू झाले आहे. याच रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांना मुरमीकरणाच्या माध्यमातून बुजवण्याचे काम ही तात्काळ करण्यात येत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम होऊन सदर रस्ता रहदारीसाठी सुरळीत सुरू होणार आहे.

यावेळी गावचे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र मुळीक, शिवाजी शंकर सावंत, सुनील निवृत्ती खरात, श्रीरंग केशव दळवी, अंकुश बबन तावरे, अजित पोपट मुळीक (पाटील), दिनेश दत्तात्रय मुळीक, गोरख बाबा मुळीक, विनायक नारायण मदने व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!