हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

गुणवरे,वडले,नाईकबोंमवाडी, मिरढे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई ; फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक साहेब‌ ॲक्शन मुड वर

(जावली/ अजिंक्य आढाव)- गेले अनेक दिवसांपासून फलटण पूर्व भागात अवैध धंदे सुरू असल्याचे चर्चा होती. यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

गुणवरे ता. फलटण गावच्या हद्दीची विलास आनंदराव जाधव वय 45 वर्ष रा.गुणवरे ता. फलटण जिल्हा सातारा हा त्याचे राहते घराचे अडोशास उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ 940/- रुपयांचा देशी दारूच्या 13 बाटल्या मिळून आल्या, मिरढे ता. फलटण गावच्या हद्दीत कैलास पांडुरंग चव्हाण राहणार नाईकबोमवाडी हा हॉटेल काजलच्या अडोशास उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ 840/- रुपयांचा देशी दारूच्या 24 बाटल्या मिळून आल्या सोनवडी बुद्रुक ता.फललटण सुरेश भगवान चव्हाण राहणार सोनवडी बुद्रूक उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ 560/- रुपयांचा देशी दारूच्या 16 बाटल्या मिळून आल्या ,पांडुरंग सोनवलकर राहणार वडले पाटील त्याच्याजवळ 455/- रुपयांचा देशी दारूच्या 13 बाटल्या मिळून आल्या त्याचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65 ( ई)प्रमाणे रेड करत तिघांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!