हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

दहिवडी पोलीस स्टेशनला 5 पुरस्कार प्राप्त ; गुन्हे आढावा बैठकीत जिल्हात पुन्हा एकदा नंबर वन

(जावली/ अजिंक्य आढाव) अतुलनीय कामगिरी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये ओळख असणारे दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय  सोनवणे व त्यांचे सहकारी यांच्या कामगिरी पुन्हा एकदा पारदर्शकता दिसुन आली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की मे  आणि जून 2024 मध्ये दहिवडी पोलीस स्टेशनला महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल, सर्वात जास्त मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल, सर्वात जास्त नॉन बेलेबल वॉरंट बजावून आरोपी अटक केल्याबद्दल आणि माननीय न्यायालयात जास्तीत जास्त गुन्हे दोषसिद्धी करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन मुद्देमाल निर्गती तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन नॉन बेलेबल वॉरंट बजावणी आणि बेस्ट पोलीस स्टेशन इन कनविक्शन रेट असे पाच पुरस्कार माननीय पोलिस अधीक्षक श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांच्या हस्ते आज रोजी सातारा येथे देण्यात आले. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे , विलास कुऱ्हाडे नीलम रासकर भामाताई काळे विलास हांगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!