ताज्या घडामोडी
एकच निर्धार “बौध्द आमदार” अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद ; विधानसभा उमेदवारी मागणीसाठी समाज एकसंघ

(प्रतिनिधी/फलटण )फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून अनुसूाचित जातीसाठी राखीव आहे. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजाला गेली तीन टर्म (१५ वर्षे) विधानसभेची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे आपणास डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी “एकच निर्धार…बौद्ध आमदार…” अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले असुन या अभियानास सर्वच गावांत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
महामेळाव्याचे भव्य आयोजन फलटण –
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संवाद अभियान दौऱ्यानंतर फलटणमध्ये बौध्द समाज बांधवांचा महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संवाद दौरा समितीच्यावतीने देण्यात आली आहे. या महामेळाव्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गाव भेटीदरम्यान करण्यात येत आहे.