गोखळी ( प्रतिनिधी) : भारती हाॅस्पिटल व डेंटल क्लिनिक (फलटण) गोखळी ग्रामपंचायत यांचे विद्यमाने शनिवार दि.२७ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य मोफत दंतचिकित्सा व निदान उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीरामध्ये पुढील उपचार पध्दतीवर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मार्गदर्शन व उपचार सवलत दिली जाणार आहे.
असे. डॉ .सौ.पूजा शिंदे यांनी सांगितले शिबीरामध्ये प्रामुख्याने दात काढणे,कवळी बसवणे,रुट कॅनाल स्टेटमेंट, कृत्रिम दंतरोपन, डिजिटल एक्स रे , दंत तपासणी, वेडीवाकडे दात काढणे, अक्कल दाढ काढणे, दातांमध्ये चांदी सिमेंट भरणे,इतर शस्त्रक्रिया , कायमस्वरूपी दात काढणे, तोंडातील सर्व प्रकारचे चट्टे सर्व रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत तरी या संधीचा लाभ घ्यावा आपले व आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन गोखळी ग्रामपंचायतीच्या माज सरपंच सौ.सुमनताई गावडे (सवई) यांनी केले आहे.