हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा अवघ्या 5 तासात उघडकीस ; दहिवडी पोलिसांची दमदार कामगिरी

आरोपीस अटक करत १२ लाख ५० रुपयेचां मुद्देमाल हस्तगत

(जावली/ अजिंक्य आढाव) – हेमंत धडांबे रा. दिवडी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांचा जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ तपासाची चक्रे फिरवून माहिती घेतली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजीत भरत पवार, रा. शेरेवाडी हा काही दिवसांपासून संशयितरित्या दिवडी गावात फिरत असल्याची माहिती प्राप्त करून त्याच्याकडे या चोरीबाबत विचारपूस करण्यासाठी त्याचा शोध घेत असताना त्याने त्याच्या नातेवाईकांना तो कोल्हापूर येथे असले बाबत माहिती दिली. परंतु त्याच्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढून तांत्रिक बाबींचा उपयोग करून अशी माहिती प्राप्त झाली की तो कोल्हापूर येथे नसून वडूज येथे आहे.त्यामुळे त्याने दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे त्याच्यावरच चोरीचा संशय बळवल्याने त्यास वडूज येथून ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच सदरची चोरी ही त्यानेच केल्याचे निष्पन्न झाल्याने अभिजीत भरत पवार यास अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून त्याने चोरी करून लपवून ठेवलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा 12 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दहिवडी पोलिसांना यश आलेले आहेत.

सदरचा गुन्हा अवघ्या 5 तासात उघडकीस आणला. या  मध्ये दहिवडी पोलिसांची कामगिरी  मा.पोलीस अधीक्षक सातारा, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी वडूज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे,पो.हवालदार विजय खाडे, पो. हवालदार बापू खांडेकर पो. हवालदार विठ्ठल विरकर,पो. नाईक स्वप्निल म्हामणे सर्व या कारवाई वेळी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!