हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

रक्षा विसर्जन वृक्षारोपण करून बंधू स्वर्गीय अशोक गावडे यांच्या स्मृती जतन

गोखळी (प्रतिनिधी). खटकेवस्ती येथील प्रगतिशील बागायतदार , फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै बजरंग गावडे यांचे बंधू अशोक दिलीप गावडे यांचे आकस्मित दुःखद निधन झाले.त्याच्या.रक्षाविसर्जन नदी पात्रात न करता स्मशानभूमी व स्वतः च्या शेतात करून स्मृती जतन करण्यात आल्या.

अत्यंत बंधूप्रेम, कौटुंबिक जिव्हाळा, सामाजिक योगदान, धार्मिक दातृत्व यात बंधूचा सिंहाचा वाटा होता. आपली जीवाभावाची सावली हरपली त्यांच्या रक्षा विसर्जन नदी पात्रात न करता शेतात करावे या प्रा. रविंद्र कोकरे सर यांच्या संदेशाचे अनुकरण आणि डॉ शिवाजीराव गावडे यांनी आपल्या मातोश्रींचे निधन झाले रक्षा विसर्जन नदी पात्रात न करता स्मशानभूमी मध्ये आणि. स्वतः च्या शेतात वृक्षारोपण करून रक्षा विसर्जन केले.तोच आदर्श घेऊन पै बजरंग गावडे कुटुंबियांनी रक्षाविसर्जन स्वतः च्या रानातच करण्याचा निर्णय घेतला स्वर्गीय अशोक गावडे स्मृतिसाठी वृक्षारोपण करून चिरंतन आठवणी स्मृती जतन करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, डॉ शिवाजीराव गावडे, श्रीराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बजरंग खटके, वस्ताद अनिल गावडे,राहुल इवरे, अरुणा नाझीरकर,धनश्री गावडे, पै.हणमत ऊर्फ मुन्ना गावडे,पै.चेतन गावडे, पै.केशव गावडे,पै.रोहन गावडे ,राजू गावडे पाटील, प्रगती माळवे, बबलु कैलास गावडे या सर्वांच्या हस्ते नारळाचे वृक्ष देऊन लागवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!