(जावली /अजिंक्य आढाव)- लोकनेते स्व.विनायकराव शामराव पाटील (आबा) यांच्या 50 व्या जयंतीनिमित्त शनिवारी दि. 20 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजता पर्यंत आदंरूड ता. फलटण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून या शिबिराला फलटण तसेच परिसरातील रक्तदात्यांनी उपस्थित रहावे असे लोकनेते विनायकराव पाटील प्रतिष्ठान आंदरुड यांच्यावतीने माहिती दिली आहे.