(जावली -अजिंक्य आढाव)- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गाव दौरा अभिमान अतंर्गत विंडणी, पिंप्रद , बरड , आदंरूड या ठिकाणी समाजातील लोकांना भेटून मार्गदर्शन करण्यात आले.फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडे आंबेडकरी बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी सामाजिक स्तरावर प्रस्ताव देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.
फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघ १५ वर्षांपासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघामध्ये अनुसूचित जातींमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध समाज आहे. संसदीय लोकशाहीतील राजकीय प्रतिनिधित्वाची संधी या प्रवर्गातील सर्व जातींना मिळणे अपेक्षित आहे. परंतु मागील ३ पंचवार्षीक म्हणजेच १५ वर्षांपासून येथील प्रमुख राजकीय पक्षांनी बौद्ध समाजाचा उमेदवार निवडणूकींत दिला नसल्याने; या दुर्लक्षाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. राजकीय आरक्षणामध्ये संख्याबहुल बौद्ध समाजाचा आद्याप विचार प्रमुख पक्षांनी केला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या विषयावर सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी बौद्ध समाज मंदिरांत मध्ये अत्यंत गांभीर्याने मिटिंग संपन्न झाली. यामध्ये फलटण कोरेगाव मतदार संघाच्या निवडणुकीत आंबेडकरी बौद्ध समाजाचा आमदार निवडून आणायचा, त्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडे आंबेडकरी बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी सामाजिक स्तरावर प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसेच या आमदारकीसाठी समाजाची भूमिका आणि पुढील दिशा जाहीर करण्यासाठी लवकरच संघटित मेळावा घेण्यात येईल.
बैठकीस प्रा. रमेश आढाव, दत्ता अहिवळे, सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे, सनी काकडे, शाम अहिवळे, विकास काकडे, ॲड. रोहित अहिवळे, नंदू मोरे, रोहित माने, शक्ती भोसले, विकी काकडे, हरीश उर्फ आप्पा काकडे, राजू काकडे , सनी मोरे, शितल अहिवळे, कपील काकडे, संग्राम अहिवळे, कुणाल काकडे , सचिन मोरे, हणमंत लोंढे, अजिंक्य आढाव ,विलास आढाव मा. उपसरपंच, युवा नेतृत्व संदेश आढाव, उत्तम भोसले ,गंगाराम आढाव, संदीप फौजी, रोडीबा आढाव ,अशोक आढाव, नाना आढाव , दिलीप आढाव,विजय आढाव, बंडा जाधव , बंडा आढाव , विक्रम कांबळे, अक्षय आढाव ,चिंतु आढाव, जगन्नाथ जाधव, प्रशांत आढाव,नितिन जाधव , गणेश अडगळे, शुभम अडगळें, महेश आडगळे, महिंद्र आढाव आदींची उपस्थिती होती