गोखळी (प्रतिनिधी): – फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी – खटकेवस्ती येथील प्रगतिशील बागायतदार श्री.अशोक दिलीप गावडे ( 56) यांचे अल्पसा आजारपणामुळे निधन झाले.
सामाजिक, धार्मिक कार्यात, एकमेकांच्या अंत विधी सावडणे दहावा सुखदुःख यामध्ये सहभागी होत असा मनमिळावू स्वभावामुळे अशोक नाना या नावाने ओळखले जात.
त्यांच्या पश्चात आई, एक विवाहित बहिण दोन विवाहित भाऊ, भावजय ,एक विवाहित मुलगी,एक मुलगा आहे.फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै बजरंग गावडे यांचे ते थोरले भाऊ तर गोखळी विकास सोसायटीच्या सदस्या सौ. उषाताई गावडे यांचे पती होत.राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत पुणे , सातारा, सांगली सोलापूर अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक, कुस्ती,राजकीय क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.