हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

फलटण राखीव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाचा उमेदवार द्यावा यासाठी एकटवले सर्वजण

(फलटण/प्रतिनिधी)फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडे आंबेडकरी बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी सामाजिक स्तरावर प्रस्ताव देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.

फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघ १५ वर्षांपासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघामध्ये अनुसूचित जातींमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध समाज आहे. संसदीय लोकशाहीतील राजकीय प्रतिनिधित्वाची संधी या प्रवर्गातील सर्व जातींना मिळणे अपेक्षित आहे. परंतु मागील ३ पंचवार्षीक म्हणजेच १५ वर्षांपासून येथील प्रमुख राजकीय पक्षांनी बौद्ध समाजाचा उमेदवार निवडणूकींत दिला नसल्याने; या दुर्लक्षाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. राजकीय आरक्षणामध्ये संख्याबहुल बौद्ध समाजाचा आद्याप विचार प्रमुख पक्षांनी केला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या विषयावर सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात अत्यंत गांभीर्याने मिटिंग संपन्न झाली. यामध्ये फलटण कोरेगाव मतदार संघाच्या निवडणुकीत आंबेडकरी बौद्ध समाजाचा आमदार निवडून आणायचा, त्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडे आंबेडकरी बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी सामाजिक स्तरावर प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसेच या आमदारकीसाठी समाजाची भूमिका आणि पुढील दिशा जाहीर करण्यासाठी लवकरच संघटित मेळावा घेण्यात येईल.

विविध पक्षाचे आंबेडकरी चळवळीतील नगरसेवक यांची भूमिका व आडचणी याबद्दल काल शासकीय विश्रामग्रहात बैठक झाली, यामध्ये समाजाचा जो उमेदवार असेल त्यासाठी काम करु असा निर्णय माजी नगरसेवक सनी अहिवळे, सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे यांनी घेतला. तर आज रिपब्लिकन पक्षाचे विजय येवले व वंचित बहूजन आघाडीचे उमेश कांबळे यांनी समाजाच्या उमेदवाराचे काम करू असे जाहीर केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या बैठकीत अनेक बांधवांनी मोकळेपणे विचार व्यक्त केले. बैठकीस प्रा. रमेश आढाव, मधुकर काकडे, विजय येवले, दत्ता अहिवळे, सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे, सनी काकडे, शाम अहिवळे, विकास काकडे, ॲड. रोहित अहिवळे, नंदू मोरे, रोहित माने, सागर सोरटे, शक्ती भोसले, विकी काकडे, बाळू अहिवळे, हरीश उर्फ आप्पा काकडे, राजू काकडे, संजय निकाळजे, दया पडकर, सनी मोरे, शितल अहिवळे, कपील काकडे, संग्राम अहिवळे, कुणाल काकडे, मोहन ढावरे, सिद्धार्थ प्रबुद्ध, सचिन मोरे, हणमंत लोंढे, ॲड.मनोज जावळे, बापूराव जगताप याबरोबरच ग्रामीण भागातून बांधव उपस्थित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!