(फलटण /प्रतिनिधी)- फलटण तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून होती. सन – १९९५ ला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यातील जनतेने अपक्ष आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजयी केले.
आमच्या पूर्वजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व तालुक्यातील जनतेच्या पाण्याची भूक भागविण्यासाठी केवळ पाणी प्रश्नावर श्रीमंत रामराजे यांनी तत्कालीन सरकारला पाठिंबा दिला व त्याबदल्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लावला हा प्रश्न मार्गी लावत असताना अनेकांचे योगदान याच्यामध्ये आहे. यातील फलटण तालुक्यामध्ये जी गावे पुनर्वसित होवून आली. पाण्यासाठी त्यांचे योगदान आम्ही महत्त्वाचे मानतो. म्हणून फलटण तालुक्यात जी जी पुनर्वसित गावे आलेली आहेत त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न असून या पार्श्वभूमीवर श्री. बिरदेव नगर येथील पुनर्वसित गोळेगाव या गावातील ज्या पण काही समस्या असतील त्या समस्या सोडविण्यासाठी वैयक्तिक मी प्राधान्य देणार असून पुनर्वसित गोळेगावचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी केले आहे.याप्रसंगी दादासाहेब चोरमले, अमरसिंह पिसाळ, अशोकराव गोळे, प्रभाकर गोळे, बाळासाहेब गोळे इत्यादी मान्यंवर उपस्थित होते.
श्रीमंत श्रीमंत रघुनाथराजे यांनी गोळेगाव येथे भेट दिली या भेटी प्रसंगी गावातील अनेक समस्या जाणून घेऊन या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडविणार असल्याचे सांगून पुनर्वसित गोळेगाव अंतर्गत सर्व रस्ते डांबरीकरण करून देणार असून साईड गटारांचा प्रश्न मार्गी लावून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणार असल्याचेही यावेळी श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले या गावातील प्रत्येक समस्या मी सोडवणार आहे कारण या लोकांनी त्याग केल्यामुळेच धरणांची निर्मिती झाली व फलटण तालुक्यात पाणी येऊ शकले व आमचा तालुका सुजलाम सुफलाम झाला आपण एवढ्या लांबून या ठिकाणी आलेला आहात याची योग्य ती काळजी घेणे आमचे कर्तव्य असून या कर्तव्यास बांधील राहून या गावाच्या विकास कामांमध्ये व तुमच्या सर्व समस्या सोडवून घेण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत असणार असल्याचे ही शेवटी श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले.