हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

राज्यातील विधानसभा निवडणुक ऑक्टोबर मध्ये..?

(परिश्रम/ न्यूज वृत्तसंस्था)- लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता 20 सप्टेंबर लागु होईल. आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल.अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बहुधा राज्यातील विधानसभा निवडणुक एकाच टप्प्यात होईल, असे सांगण्यात आले आहे.

याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे

विधानसभा निवडणुकीबाबत अधिकारी काय म्हणाले

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 20 सप्टेंबर पासून लागू होईल

ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथा आठवड्यात मतदान शक्य

20 ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची सूचना

एका अधिकाऱ्याने सांगितले 2019 मध्ये 27 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. तर 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होती, तर 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. आता “आम्ही त्यांचा विधानसभा निवडणूकीची” तयारी करीत आहोत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांने पुढे म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने 20 जून रोजी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिली आहे त्यांना 1 जून 2024 ही पात्र तारीख म्हणून फोटो मतदार यादी सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने दिल्या महत्त्वाच्या सूचना

त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 24 जून 2024 मतदान केंद्रांची सुसूत्रीकरण, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे छायाचित्रांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि चांगल्या दर्जांच्या छायाचित्रांची खात्री करण्याबाबत विचारणा केली आहे.

तसेच त्यांना 25 एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे प्रत्येक शनिवार आणि रविवारी विशेष मोहिम असेल आणि 20 ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

सर्व नोंदणीकृत कुटुंब सदस्य एकाच विभागात

सर्व नोंदणीकृत कुटुंब सदस्य एकाच विभागात आणि त्याच ठिकाणी राहतील तळमजल्यावरच मतदान केंद्रीय असतील आणि मतदारांना दोन किमी पेक्षा जास्त प्रवास करण्याची गरज भासणार नाही असेही निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत दरम्यान महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!