हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

“आरंभ है प्रचंड” या प्रेरणादायी पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे खा.शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

(फलटण/प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व विक्रमी प्रतींची विक्री झालेल्या लेखक सचिन गोसावी लिखित ‘आरंभ है प्रचंड ‘ या प्रेरणादायी व व्यक्तिमत्त्व विकासविषयक पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा खा.शरद पवार यांच्या हस्ते बारामती (गोविंदबाग) येथे पार पडला.

या प्रकाशन सोहळ्यासाठी कराड-पाटण शिक्षक बॅंकेचे संचालक प्रविण मोरे सर,युवा उद्योजक बाबुराव भोसले सर,साहित्यिक अ‍ॅडव्होकेट आकाश आढाव सर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजपरिवर्तन व समाजप्रबोधनाच्या उद्देशाने लिहिलेले हे प्रेरणादायी पुस्तक तरूणांसोबतच समाजातील प्रत्येक घटकास एक दिशादर्शक आहे.तसेच वैफल्य व नैराश्य दूर करून आयुष्याचा एक नवा मार्ग दाखवणा-या या पुस्तकाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता अल्पावधीतच हे पुस्तक महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले असेल,असा मला विश्वास वाटतो.

तसेच लेखक सचिन गोसावी यांनी समाजपरिवर्तनासाठी केलेले निर्भीड लेखन ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.त्यांची व त्यांच्या पुस्तकाची पुढील वाटचाल निश्चितच यशस्वी असेल,असे मत या पुस्तक प्रकाशनावेळी खा.शरद पवार यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!