ताज्या घडामोडी
“आरंभ है प्रचंड” या प्रेरणादायी पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे खा.शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
(फलटण/प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व विक्रमी प्रतींची विक्री झालेल्या लेखक सचिन गोसावी लिखित ‘आरंभ है प्रचंड ‘ या प्रेरणादायी व व्यक्तिमत्त्व विकासविषयक पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा खा.शरद पवार यांच्या हस्ते बारामती (गोविंदबाग) येथे पार पडला.
या प्रकाशन सोहळ्यासाठी कराड-पाटण शिक्षक बॅंकेचे संचालक प्रविण मोरे सर,युवा उद्योजक बाबुराव भोसले सर,साहित्यिक अॅडव्होकेट आकाश आढाव सर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.