(जावली/ अजिंक्य आढाव)- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने जिल्ह्यात 17 जून ते 1 जुलै या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येतो आहे. या पंधरवड्या मध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. फलटण पूर्व भागातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या पंधरवाडयामध्ये सहभागी व्हावे कृषी मंडल अधिकारी बरड अशोक नाळे यांनी आवाहन केले.
या पंधरवडयाची सांगता दिनांक 1 जुलै, 2024 रोजी होईल. स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषि दिना आंदरुड ता फलटण येथे साजरा करण्यात आला.
या पंधरवाड्यामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ठ मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे हा या कृषि संजीवनी पंधरवाडा कार्यक्रमाचा उद्देश आहे. सर्व गावांत उपक्रम प्रेरणादायी ठरेल आहेत.या पुढं सातारा जिल्हृयात सर्व गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्याची सुरुवात 17 जून 2024 पासून झाली शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक जनजागृती मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध पिकांवर करावयाच्या बीजप्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी माहिती देण्यात आली. बीजप्रक्रीयेचे महत्व जमिनीतून तसेच बियाणेद्वारे पसरणारे बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे दि. 19 जुन ते 1 जुलै, 2024 या कालावधीत प्रत्येक दिवशी खालीलप्रमाणे महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती कृषी अधिकारी, जावली सतीश हिप्परकर यांनी सांगितले