सातारा – (जि.मा.का) शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबधित राखणेसाठी राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक विमा राबविणेचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सातारा जिल्हयातील सन २०२४ -२५ मधील मृग बहारातील डाळिंब , पेरू व सीताफळ या पिकांचा सामावेश करण्यात आला असुन या योजनेत काही बदल केले आहेत. ही योजना आता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. तरी विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
या योजनेत शेतकऱ्यांनी फक्त ५ टक्के रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे विमा हप्त्याची रक्कम अल्प असुन ती प्रती हेक्टरी पुढीलप्रमाणे : पीक- डाळिंब, बहार- मृग , सहभागाची मुदत – १४ जुलै २०२४ , हे. विमा संरक्षित रक्कम – १ लाख ६० हजार, हे. विमा हप्ता रु.शेतकरी हिस्सा – ८ हजार, हे. विमा हप्ता रक्कम शासन हिस्सा- ६ हजार ४०० आहे. पेरू या पिकासाठी बहार- मृग , सहभागाची मुदत, २५ जून २०२४, हे.विमा संरक्षित रक्कम ७० हजार, हे. विमा हप्ता रु.शेतकरी हिस्सा – ३ हजार ५०० रुपये, हे. विमा हप्ता रक्कम शासन हिस्सा – ३ हजार ५०० रुपये. सीताफळ या पिकासाठी मृग बहार – सहभागाची मुदत – ३१ जुलै २०२४ हे.विमा संरक्षित रक्कम – ७० हजार , हे. विमा हप्ता रु.शेतकरी हिस्सा – ३ हजार ५०० रू. , हे. विमा हप्ता रक्कम शासन हिस्सा–९ हजार १००रु.
जिल्हयातील तालुकानिहाय , महसुल मंडलनिहाय अधिसुचित फळपीके पुढिलप्रमाणे,
डाळिंब या पीकासाठी मृग बहार कोरेगाव तालुका, वाठार स्टेशन, खडांळा तालुक्यात ,खंडाळा, लोणंद, शिरवळ खटाव तालुक्यातील खटाव, वडूज , पुसेगाव, औंध,पुसेसावळी , मायणी , कातरखटाव, बुध निमसोड, कलेढोण फलटण तालुक्यातील फलटण, राजाळे, आसू, गिरवी, बरड, आदर्की बु. तरडगाव, होळ, वाठार निं, कोळकी माण तालुक्यातील दहिवडी, मलवडी, मार्डी, गोंदवले बु. म्हसवड, कुकुडवाड, शिंगणापूर , वर, मलवडी, आंधळी ही गावे आहेत. पेरु या पिकासाठी फलटण तालुक्यातील गिरवी,बरड .कोळकी तसेच खंडाळा तालुक्यातील खंडाळा, लोणंद, शिरवळ, वाठार बु. ही गावे आहेत. सिताफळ या पिकासाठी फलटण तालुक्यातील गिरवी, बरड, कोळकी तसेच खंडाळा तालुक्यातील खंडाळा, लोणंद, शिरवळ, वाठार बु. ही गावे आहेत.
शेतकऱ्यांना ज्या शेतातील अधिसुचित फळपीकाचा विमा उतरावयचा आहे त्या शेताचा ७/१२ उतारा व ८ अ चा खाते उतारा तसेच आपले ज्या राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी विमा हप्ता भरावयाचा आहे. सार्वजनिक सुविधा केंद्रांमार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुन ही विमा हप्ता भरता येईल. ७/१२ उतारा प्राप्त होत नसल्यास अधिसुचित पीक असल्याचे स्वयंघेाषणा पत्र जोडणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक विहीत नमुण्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असुन अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक , मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.