(जावली/ अजिंक्य आढाव) आज दि.१७ रोजी सायंकाळी फलटण पूर्व भागात ढगफुटी सदृश्य परिस्थितीने मुसळधार पाऊस झाल्याने परिसर जलमय झाला आहे.फलटण तालुक्यातील ओढ्यांना , नाल्यांना पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दुधेबावी, मिरढे,सोनवडी, जावली सह परिसरात ओढ्या, नाल्यांंचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत पर्याय मार्गाचा वापर करावा असे फलटण ग्रामीण पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.