(फलटण /प्रतिनिधी) – खटकेवस्ती गोखळी ता. फलटण येथील लोकनियुक्त सरपंच तथा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय बापूराव दत्तात्रय गावडे यांची फलटण तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीही त्यांची संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र दरम्यानच्या काळात सत्तांतर झाल्यामुळे या निवडी रद्द करण्यात आल्या होत्या. पुन्हा नव्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभाग नोंदविला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत आली असल्यामुळे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभेचे कार्यक्षम आमदार दिपकराव चव्हाण यांच्या शिफारसीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार बापूराव गावडे यांची संजय गांधी व स्वावलंबन योजनेच्या अध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली असल्याचे एका परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
बापूराव गावडे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, फलटण तालुका दूध उत्पादक पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भिमदेवराव बुरुंगले सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मिलिंद नेवसे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, ॲड.ऋषिकेश काशीद, पोपटराव बुरुंगले, रामभाऊ घोडके, सातारा जिल्हा परिषदेची माजी सदस्य विश्वासराव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याची संचालक संतोषराव खटके, गोखळी ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज गावडे, सचिन लाळगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी बापूराव गावडे यांचे अभिनंदन केले आहे.