हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

फलटण पोलीसांकडून शहरातील व गावाकडील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन

(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण पोलीस कडुन शहरातील व गावाकडील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन पोलीस बतावणी म्हणजे काय… ?

➡️ पोलीस बतावणी म्हणजे पोलीस आहे सांगून, वयस्कर लोकांची फसवणूक करणे हा प्रकार आहे, तरी हा प्रकार होतो कसा ?

➡️या बद्दल आपणाला आम्ही माहिती देत आहोत जेणे करून तुमच्या सोबत व तुमच्या घरातील वयस्क लोकांनसोबत अशी फसवणूक होऊ नये म्हणून शहरतील व गावाकडील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की, सध्या आपल्या शहरात,गावात आपणाला असे प्रकार ऐकायला मिळत असतील की दोन अनोळखी इसम जे स्पोर्ट बाईक / मोटरसायकल वरती आले त्यातील एकाने हेल्मेट, जर्किंग घातलेले होते. त्यांनी मला पोलीस आहे असे सांगितले व माझ्या हातातील अंगठी व चैन काडून कश्या पद्धतीने घेतली हे समजलेच नाही ?

➡️तरी हा प्रकार होतो असा की रस्त्याने जाणाऱ्या एकटा व्यक्तीस हे लोक टार्गेट करतात की जो शक्यतो वयस्कर असेल,ज्याचे वय हे 65 ते 80 च्या दरम्यान असेल अश्या लोकांना थांबवून आम्ही पोलीस अधिकारी आहोत, पुढे नाकाबंदी चालू आहे किंवा आजकाल चोऱ्या खूप होतायत आणि आपण हातात गळयात,अंगठी चैन घालून फिरत आहात, त्याच वेळी एक इसम जो बाजूने चालत जात असतो त्याला थांबवतात आणि बोलतात तु कुठे चालला आहेस थांब ती अंगठी चैन काड रुमालत बाध आणि खिश्यात ठेव हा प्रकार वयक्स इसम पाहत असतो त्याला वाटते खरंच हा पोलीस आहे आपण ही असे केले पाहिजे आणि तो त्या वयक्स व्यक्तीला ही तेच करायला सांगतो की ती अंगठी / चैन काडा रुमालात बांधा आणि त्याच वेळी हात चालकीने तो ती अंगठी चैन काडून घेतो आणि तो लगेच ते दोघे ही निघून जातात काही वेळाने वयस्क व्यक्तीला समजते की नक्की काही तरी झाले म्हणून, तो खिश्यात ठेवलेला रुमाल पाहतो तर रुमालात अंगठी चैन नसते मग तो घाबरून पोलीस स्टेशन ला जातो परंतु त्यांना कोणती गाडी, त्या व्यक्तीचे वर्णन सांगतात येत नाही, कारण सहाजिक आहे वयस्क असल्याने नक्कीच आपल्या सोबत काहीतरी घडले हेच समजत नाही तरी असे प्रकार घडत आहेत.

➡️ तरी पोलीस अश्या लोकांचा शोध घेत च आहेत, तरी सर्व नागरिकांनी घरातील वयस्क लोकांना सांगावे की हा पोलीस बतावणी चा प्रकार आहे. तरी कोणीही असे संशयित दिसल्यास रोड ला थांबू नये किंवा थांबवण्याचा प्रयत्न झाल्यास थांबू नये व अशी माहिती किंवा संशयित दिसल्यात पोलीसाशी संपर्क करावा अशी बतावणी करून वयस्कर लोकांना लुटण्याचा हा एक प्रकार चालू आहे.

➡️तरी सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की अशाप्रकारे खरा पोलीस किंवा अधिकारी हे कधीही लोकांना रस्त्यावर थांबून अंगझडती घेऊन त्यांच्याकडे सोन्याचे दागिने काढून घेत नाही किंवा खोटी माहिती सांगत नाही. तरी कृपया सर्व नागरिकांनी अशाप्रकारे कुठल्या ही फसवणूकीस बळी पडू नये असे काही घडत असल्यास तात्काळ जवळील पोलीस स्टेशन शी पोलिसांना संपर्क करावा.

अशी घटना किंवा संशयित दिसल्यास / माहिती मिळल्यास तात्काळ डायल ☎️112 वरती संपर्क करावा.

असे आवाहन फलटण पोलीस अधीक्षक राहुल धस, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!