(जावली/अजिंक्य आढाव) – राजुरी ता. फलटण येथील दीप गार्डन हाॅटेल समोर पुणे पंढरपूर रोडवर समोर दि.५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भरधाव एसटीने ऊस वाहतुकीसाठी बैलगाडीला दिलेल्या धडकेत एका बैलांसह बैलगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
या बाबत एसटी चालक भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे वय ४४रा.रडडे ता. मंगळवेढा यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि.५ रोजी ८:३०वाजण्याच्या पुणे पंढरपूर रोडवरील राजुरी गावच्या हद्दीत दीप गार्डन समोर एसटी चालक भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे यांनी त्यांच्या ताब्यातील एसटी चालक क्रमांक एम.एच.१४ बीटी ३३५९ रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. या मध्ये एका बैलांसह बैलगाडी चालक सोनू अभिमन्यू सोनवणे वय ३१राहणार बोधवड ता.भुसावळा जि.जळगाव यांचा जागीच मृत्यू झाला.
या बाबत फिर्याद वैभव गावडे रा. राजुरी यांनी दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.